Ad will apear here
Next
आझम कँम्पसमध्ये काव्य संमेलन
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

आझम कँम्पस ग्रीन ऑडिटोरियम येथे हे काव्य संमेलन झाले. गझलकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी या संमेलनाचे उद्घाटन करून गझल सादर केल्या.

उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, ‘आझम कँम्पसच्या पुढाकाराने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. मराठी लेखनात काव्य हा लोकप्रिय काव्यप्रकार आहे. कविता लिहिणे हा आनंददायक प्रकार असतो. भावनांना शब्दांत आपण दाद देतो तेव्हा कविता जन्माला येते. मिर्झा गालीब यांची शायरी लिहिण्यावरील निष्ठेने समाजात लोकप्रिय झाली.’ मराठीतून स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँग्लो उर्दू बाईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य परवीन शेख यांनी केले. मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख यांनी संयोजन केले. या वेळी कविता भोसले उपस्थित होत्या. संमेलनात २००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

परीक्षण नूतन शेटे, झुबेर पटेल यांनी केले. इम्रान झारेगीर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZYABK
Similar Posts
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
‘रंगूनवाला’मध्ये माजी विद्यार्थी मेळावा पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचा माजी विद्यार्थी मेळावा चांगल्या प्रतिसादात नुकताच उत्साहात झाला. ‘बॉलीवूड’ ही या मेळाव्याची थीम होती. मेळाव्याचे हे दुसरे वर्ष होते.
इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language